MH13 News Network
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा 834 वा दिव्य शिवयोग समाधी सोहळा हा रविवारी 26 मार्च रोजी भक्तीमय वातावरणात साजरा होणार असल्याची माहिती आनंद हब्बू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.श्री सिध्दरामेश्वर देवस्थान हब्बू पुजारी परीवार चॅरीटेबल ट्रस्ट आणि श्री सिध्देश्वर पालखी मंडळ तसेच भक्तगणांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.लिंगैक्य श्री.तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशिर्वादाने आणि धर्मरत्न श्री श्री श्री 1008 ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपिठ यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा पार पडणार आहे.
शिवयोग समाधीला 834 वर्षेपुर्ण झाल्यानिमित्त सकाळी ठीक 6.30 वाजता शिवयोग समाधीस रुद्राभिषेक शिवपंचाक्षर मंत्रघोष तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून,या सोहळ्यास भक्तगणांनी उपस्थित राहावे आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री सिध्दरामेश्वर देवस्थान हब्बू वहिवाटदार पुजारी चॅरीटेबल ट्रस्ट व श्री सिध्देश्वर पालखी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.