Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

 

सोलापूर,(प्रतिनिधी):- भगवंताच्या विराट स्वरूपात सर्वकाही आहे आणि भागवत ग्रंथातून प्रत्येकाला अंतिम ध्येय प्राप्त होते असे प्रतिपादन हभप चारूदत्त आफळे गुरूजी यांनी केले. डॉ. राजीव दबडे आणि डॉ.माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई हॉस्पिटलच्या वतीने किर्लोस्कर सभागृहात आयोजित भागवत पुराण कथा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफत असताना त्यांनी भगवंताच्या विराट स्वरूपाबाबत महती विशद केली.

आपल्या मूळ स्वरूपात आल्यानंतर मिळालेला आनंद परमोच्च आहे. त्यामुळे काहीही झाले तरी आपले मूळ स्वरूप आपल्याला आले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. भागवत पुराण कथेतील विविध घटना आणि प्रसंग आपल्या रसाळ वाणीतून हभप चारूदत्त आफळे गुरूजी यांनी मांडून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले. भागवत पुराणातील विविध घटना घडामोडी सांगत मध्ये मध्ये भक्ती गीते आणि भजनही सादर करण्यात आली. प्रारंभी डॉ. माधुरी दबडे आणि डॉ. राजीव दबडे यांनी हभप चारूदत्त आफळे गुरूजी यांचे स्वागत आणि सत्कार केला. त्यानंतर भगवंताचे नामस्मरण करण्यात आले आणि त्यानंतर भागवत पुराण कथेला प्रारंभ करण्यात आला. गुरूवार दि. 23 मार्च पासून किर्लोस्कर सभागृहात सुरू झालेल्या भागवत पुराण कथा सप्ताहाच्या या दुसऱ्या दिवशी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केलेली होती. किर्लोस्कर सभागृह अपुरे पडल्याने भाविकांनी सभागृहाच्या बाहेर खुर्च्यावर बसून भागवत सप्ताहात सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *