Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

 

  मुंबईदि. 29 : पाच लाख रूपये किलो किमतीचे केसर तसेच सहा हजार रूपये किलो किमतीची वेलची जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या कार्यगटाच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईत जी-20 च्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाची बैठक सुरू आहे. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे आयोजित या बैठकीकरिता आलेल्या सदस्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यात केंद्र शासनाच्या स्पाइस बोर्डच्या माध्यमातून भारतातील हजारो वर्षांची परंपरा असलेले मसाले प्रदर्शित करण्यात आले आहेत.

            या विषयी माहिती देताना स्पाइस बोर्डाचे विपणन संचालक बसिस्थ नारायण झा यांनी सांगितले कीसुमारे 180 देशांमध्ये निर्यात होणाऱ्या या मसाल्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. 800 प्रकारचे मसालेत्यांचे अर्कमिश्रण आदींना जगभरात मागणी आहे. पोषक घटक पदार्थआयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधने यात हे पदार्थ वापरले जातात. जगात मसाल्यांच्या व्यवसायाची सुमारे 33 हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे. यापैकी 47 टक्के एवढा व्यापार एकट्या भारतातून होतो. याबाबतची अधिक माहिती www.indianspices.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

            जी – 20 च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकी दरम्यानभारतीय चहा महामंडळभारतीय कॉफी महामंडळभारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहाकॉफीमसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *