Big9 News
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात उत्तर सोलापूर तालुका शिवसेना वतीने शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या आदेशानुसार तालुकाप्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे आंदोलन करण्यात आले.
आम्हा शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच अशाप्रकारचे वक्तव्य शिवसैनिकांकडून कदापि खपवून घेतले जाणार नाही. असा इशाराही शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख संजय पौळ यांनी दिला.
यावेळी तालुका प्रमुख संजय पौळ शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन घोडके, संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष नितीन भोसले ,माजी सभापती धनंजय लामकाने विभाग प्रमुख हरिदास कुंभार , महेश साठे कारंबा गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप, उपविभाग प्रमुख सतिश गरड, नागनाथ गुत्ती ,शाखाप्रमुख उपविभाग प्रमुख अरुण लोंढे, अकोलेकाटीचे उपसरपंच राजेंद्र घाटे, प्रसिध्दी प्रमुख प्रशांत चव्हाण, शाखाप्रमुख प्रमोद गवळी , गणेश खारे गणेश काळे सिद्धेश्वर थिटे भाऊ कांबळे , गुळवंची चे उपसरपंच सागर राठोड युवासेनेचे समाधान साबळे, गुळवंची चे सरपंच दिनेश जगताप , गुळवंची गावचे माजी सरपंच विष्णू भोसले, उपसरपंच श्रीकांत आदाटे, महावीर भोसले कारंबा चे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप शशिकांत आतकरे , शिवाजी वाकसे , मारुती ढगे , योगेश माळी , नान्नजचे उपशाखाप्रमुख अनिल पवार सुभाष गावडे यांसह तालुक्यांतील शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.