Big9 News
सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्यातर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त दिनांक 14 मे ते 17 मे 2023 यादरम्यान मोफत लाठीकाठी युद्धकला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर होम मैदान या ठिकाणी संध्याकाळी साडेसहा ते आठ च्या दरम्यान देण्यात येत आहे या प्रशिक्षण शिबिराचा आज दिनांक 14 मे रोजी पहिला दिवस पहिल्याच दिवशी 70 विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये उपस्थिती लावत लाठीकाठी युद्ध कलेचे प्रशिक्षण घेणे सुरुवात केली यामध्ये अबाल वृद्धांपासून महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नीतिमत्तेची पिढी घडावी.त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा प्राप्त असलेली युद्ध कला, प्रचार,प्रसार त्याचबरोबर ही कला जोपासली जावी. या अनुषंगाने सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्यातर्फे हे शिबिर घेण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक शिबिरातील मोफत लाटीकाटी सोबतच सहभागी प्रमाणपत्र व प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर शिबिरामध्ये लाटी-काटीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मुख्य प्रशिक्षक श्री शिवराम भोसले. श्री अश्विन कडलासकर यांनी दिले तर सह प्रशिक्षक म्हणून प्रातोष आळंद. तनवी पवार. रजनी खानापुरे. छत्रवीर पवार. यांनी प्रशिक्षण दिले… तरी या प्रशिक्षणात सोलापूर वाशी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवावी असे आव्हान सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्यातर्फे करण्यात आले.
आपला
अश्विन कडलासकर
जिल्हा सचिव तथा एशियन निर्णायक लाठी असोशियन
7558457177
Leave a Reply