Big9news Network
बार्शी काँग्रेस अध्यक्ष जीवन दत्त अरगडे यांनी शनिवार-रविवार बार्शी शहरात कडक लॉकडाऊन असतानाही दिनांक 17 एप्रिल शनिवार रोजी बार्शी शहरातील चांदमल ज्वेलस हे दुकान उघडे असल्याची माहिती बार्शी शहर पोलीस स्टेशनला कळवली. याची पाहणी करण्यासाठी बार्शी शहराचे पोलीस कर्मचारी गेले असताना सदरील दुकान सुरू असल्याचे आढळून आल्यामुळे बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे चांदमल ज्वेलर्सचे मालक गुगळे यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला.
या अगोदरही गेल्या 15 दिवसा खाली सावकारी गुन्ह्याखाली व नागरिकांची दमदाटी करून मालमत्ता हडप करण्याचे गुन्हा नोंद झालेला असल्याची माहिती पोलिस स्टेशनचे, पोलिस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी दिली.
तसेच काही यूट्यूब (YouTube) चॅनल ला खोट्या मुलाखत देत, त्याच बरोबर पूर्वग्रहदूषित (Biased) होऊन अशा प्रकारचे खोटे व पोलिसांची चरित्र हनन करणारे तथ्यहीन आरोप केलेले आहेत. पोलीस प्रशासनाची बदनामी करत असल्याचे आढळून आल्यामुळे लवकरच गुगळे यांच्यावर पोलिस प्रशासना मार्फत लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी सांगितले.