उदगीर/प्रतिनिधी :
कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदुत ओम हणमे, अक्षय डोके, शुभम जगताप, समर्थ जगताप, प्रदीप कुंडकरी, सुरज जाधव व प्रसाद कांबळे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची भेट घेतली.
शेतकऱ्यांना पीक कसे घ्यायचे हे चांगले माहीत असते परंतु बँकेकडून कर्ज कसे मिळवायचे याची माहिती नसते. अज्ञानाअभावी अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून कर्जबाजारी व्हावे लागते.
कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून विविध कर्ज योजनेची माहिती घेतली.
शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेताना खूप सार्या अडी अडचणी येत असतात. त्यासाठी कृषी दुतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत बँकेच्या कर्जाची माहिती, त्याचे व्याज, कर्जाचा परतावा, शासनाकडून मिळणारी सबसिडी, विविध पिकांसाठी शासनाकडून मिळणारे कर्ज,याबाबत माहिती देण्यात येऊन शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बँकेचे अधिकाऱ्यांचे महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी आभार मानले.
Leave a Reply