MH13 News Network
परमबीर सिंह यांच्या आरोपांबाबत अॅडव्होकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी करण्यात आली. यावेळी हायकोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाने सीबीआय चौकशी लावली आहे. तसेच गृहमंत्री पदावर असताना सीबीआय चौकशी करणे योग्य नसल्याने अखेर गृहमंत्री अनिल देशमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.