Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना तेथील भाजपाच्या योगी सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर केंद्रातील भाजपा सरकारकडून व भाजप शाषितराज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे. भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनीलाही लाजवेल अशा प्रकारचे असून लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांना सामुहिकरित्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याची घटना स्वातंत्र पूर्व काळातीली जनरल डायरने केलेल्या हत्याकांडाची आठवण करून देणारी आहे. या प्रकारच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या भारतीय काँग्रेसच्या नेत्या  प्रियंका गांधी यांना तुरुंगात डांबून इंग्रज राजवटीचा परीचय भाजप सरकारने करून दिला आहे. व इतर नेत्यांनाही अटक केली. अशा या क्रूर अत्याचारी भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरु आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने अंगावर गाडी घालून लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी देशाचे आदरणीय नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब, राज्याचे मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष  नाना पटोले  यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व इतर मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीने सोमवार दि. ११ रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.

तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींना कोरोना साथ रोगाचे नियम पाळून, आपला व्यवसाय पूर्ण बंद ठेवून या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होवून शेतकऱ्यांवरील अत्याचारी जुलमी घटनेचा निषेध करावा. या महाराष्ट्र बंद आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना व मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीतील सर्व जिल्हा कमिट्या आघाडी संघटना, विविध सेल व विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन महाराष्ट्र बंद यशस्वी करावा. या महाराष्ट्र बंद मध्ये अत्यावश्यक सेवा उघडण्यात आलेल्या आहेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *