MH 13 News Network
अक्कलकोट (प्रतिनिधी) – आपण व संपूर्ण फडणवीस कुटूंबीय स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी समर्थ हे एक अवलिया दैवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथे येऊन स्वामी दर्शन घेण्याचे मानस होते, ती इच्छा आज पूर्ण झाल्याने मन गहिवरले असल्याचे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विक्रम जाधव, रवि मलवे, संजय पवार, गिरीश पवार, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस व कुटुंबीयांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थान कार्यालयात त्यांचा सन्मान करण्यात आला तो प्रसंग.