Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH 13 News Network

बार्शी : डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुद्देशीय संस्था ,बार्शी आयोजित डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे ‘जीवन गौरव पुरस्कार २०२२-२३’ , वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता हा वितरण समारंभ संपन्न होणार आहे. कै. यशवंत चव्हाण ग्रंथालय हॉल, श्री शिवाजी कॉलेज कॅम्पस, बार्शी येथे हा सोहळा पार पडणार आहे. इतिहास तज्ज्ञ व विचारवंत डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राजा माने हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.

बार्शी येथे रंगणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध वक्ता व इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते संपंन्न होणार आहे. तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील , खजिनदार  जयकुमार शितोळे आणि जॉईंट सेक्रेटरी  अरुणजी देबडवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.

या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते नऊ क्षेत्रातील नऊ गुणवंतांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात आपले योगदान असणारे शंकर उर्फ बापूसाहेब कोकाटे, कृषी क्षेत्रातील  तुळशीदास गव्हाणे , साहित्य क्षेत्रातील प्रा. डॉ. सुनील विभुते, बांधकाम उद्योजक क्षेत्रातील  प्रशांत पैकेकर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.  किशोर गोडगे, पत्रकारिता क्षेत्रातील  चंद्रकांत करडे, शैक्षणिक क्षेत्रातील  विजय भानवसे , कला क्षेत्रातील  मोहम्मद बागवान आणि क्रीडा क्षेत्रातील प्रा. डॉ. दत्तप्रसाद सोनटक्के आदी मान्यवर या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *