Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर मध्ये वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता शहरातील विविध हॉस्पिटल महापालिकेच्यावतीने अधिग्रहित करण्यात येत आहे , त्या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 5 हॉस्पिटल DCHC साठी अधिग्रहण केले आहे. त्यामध्ये एकूण 62 कोविड19 साठी बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यामध्ये नोबल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल जनरल बेड-15, o2 -10 बेड, जुनाडे नर्सिंग होम 5 बेड, सुवा नर्सिंग होम 4 जनरल बेड, o2- 08 बेड, एस आय हॉस्पिटल जनरल 04 बेड,o2-06 बेड,निर्मला मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जनरल 02 बेड, o2–08 बेड असे एकूण 5 हॉस्पिटलमध्ये जनरल 30 बेड व o2–32 बेड रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आले. असून शहरातील नागरिकांना आव्हान आहे की कोरोनाचे लागण झालेल्या व्यक्तींनी या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता अशी माहिती मा.आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *