Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

जनता महागाई, बेरोजगारी, रोजची इंधन-खाद्यतेल दरवाढ, लोडशेडींग अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त आहे. दुसरीकडे विविध समाज घटक आरक्षणाच्या प्रश्नाने अस्वस्थ आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण असे सगळेच आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत. कोरोना महामारीच्या दणक्याने कंबरडे मोडलेली सर्वसामान्य जनता केंद्र, राज्य सरकार दिलासा देणारं काही तरी राजकारण करेल या प्रतिक्षेत आहे.राजकारण्यांना लोकांची प्रश्न सोडविण्याची सद्बुद्धी लाभावी यासाठी “भजन आंदोलन” केले जाणार आहे. अशी माहिती संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी दिली.

शेतकरी त्याचे पिढ्यान-पिढ्यांचे प्रश्न कधी सुटतील या विवंचनेत आहे. हे सगळे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी मात्र एकमेकाची उणी-दुणी काढणे, चिखलफेक करत राजकीय शिमगा साजरा करण्यात मग्न आहेत. धार्मिक, जातीय तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जनमानस प्रक्षुब्ध करण्याच्या कुटील कारस्थानात रममाण आहेत. राजकीय पक्षांच्या या बेबंदशाहीने जनता हवालदिल झाली असून जनमानस अस्वस्थ झाले आहे. कुणी तरी या राजकीय व्यवस्थेला जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज जनतेमधून व्यक्त केली जात आहे. जनतेचा हा आवाज राजकीय व्यवस्थापर्यंत पोचविण्यासाठी आणि भरकटलेल्या राजकीय व्यवस्थेला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी संभाजी आरमारने पुढाकार घेतला आहे.

या राजकारण्यांना लोकांची प्रश्न सोडविण्याची सद्बुद्धी लाभावी यासाठी “भजन आंदोलन” केले जाणार आहे. सोमवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पूनम गेट, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाणार आहे. राजकीय व्यवस्थेला ताळ्यावर आणण्याच्या संभाजी आरमारच्या या अभिनव प्रयत्नात सामील होण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *