तुला मिळतंय की मला मिळतंय ! सोलापुरात खरेदीसाठी तुफान गर्दी

Big9news Network

काल गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊन ची घोषणा केली. आज शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोलापूर शहरातील नागरिकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. आजची ही गर्दी कोरोना वाढण्यासाठी पोषक ठरेल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.


शहरातील डी मार्ट जवळ सकाळी सहा वाजल्यापासून नागरिकांनी रांगाच्या रांगा लावल्या होत्या. खरेदीचे सामान घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. विशेष म्हणजे महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर घरातील अत्यावश्यक खरेदीसाठी सकाळी सहा वाजल्यापासून तयारीत आहेत.

रेल्वे स्टेशन परिसरात भाजी खरेदीसाठी झुंबड

रोजचा भाजीपाला घेण्यासाठी रेल्वे स्टेशन येथील भाजी मंडईत तोबा गर्दी झाली आहे. भाजी फळे घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स येथे पाळले गेले नाही. प्रशासन हतबल ठरत असून नागरिकांनी पुढील आठ दिवसांचा भाजीपाला आजच खरेदी करण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे.

(फोटो -ANB)