Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

महेश हणमे/सोलापूर

सोलापुरातील जड वाहतुकीचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय असतो. आजवर अनेक बळी सोलापूर- हैदराबाद रोडवर गेलेले आहेत . शहरातून जड वाहतूक बंद करावी यासाठी अनेक संघटनांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी आंदोलने केली. तात्पुरता निर्णय होतो… आणि परिस्थिती जैसे थे !!!

आज सोमवारी दुपारी साधारण सव्वा तीनच्या सुमारास सोलापूर- हैदराबाद रोडवरील मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात झाला असून अंगावरून चाक गेल्याने सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

Road accident

सायकल वरुन जाणाऱ्या एका मध्यमवयीन पुरुषाच्या अंगावर सिमेंटचा वाहतूक करणारा बंकर ( कंटेनर) गेल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली असून पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत.
kA32 0810 असा धडक दिलेल्या गाडीचा क्रमांक आहे.

Hyderabad road accident

वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…

जड वाहतुकीबाबत शहर पोलीस आयुक्त यांनी काही नियम केलेले आहेत परंतु,या नियमांचे पालन होते का हा प्रश्न उपस्थित होत आहे. चिरीमिरी घेऊन जड वाहने शहरातून सोडली जात असल्याने ‘मौत की सडक ‘ अजून किती जणांचे जीव घेणार ?असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी विचारला आहे.

ही बातमी अपडेट होत राहील….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *