कुंभारी टोल नाक्यावर विचित्र अपघात ; पती-पत्नीसह मुले जखमी
आज दिनांक 26 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक
आणि कारचा अपघात झाला यामध्ये पती-पत्नी सह मुले जखमी झाले आहेत.
तीन ट्रकने एकामागून एक धडक दिल्याने हा विचित्र अपघात झाला.
ट्रक क्रमांक KA 32 B 1777, इर्टीगा कार क्रमांक MH 25 AL4070, बलकर ट्रक क्रमांक MH 12 SX 1171 व ट्रक क्रमांक TN 52 J3679 यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाल्याने ट्रक चालकासह कार मधील प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलीस हवालदार दासरी,वाळूनजकार,बनकर,गायकवाड,होनमोरे,मोरे,सूर्यवंशी ,काळोखे असे पोलीस स्टाफ त्या ठिकाणी धावून गेला.
क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. रुग्णवाहिकेच्या मदतीतून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. अशी माहिती देण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या साह्याने दोन तास मदतकार्य सुरू होते.
जखमींची नावे
1.सचिन सुरेंद्र खटके वय 35,
2. सपना सचिन खटके 26,
3. परमेश्वर शिवाजी सोनटक्के 40,
4.पल्लवी गिरिष तिवारी 28,
5. तीन लहान मुले सर्व रा .उस्मानाबाद व
6)ट्रक चालक गणेशन या सर्वजणांना सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता पाठवले आहे.
व ट्रक क्रमांक TN52 J 3679 मध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून उपचाराकरता हॉस्पिटल ला दाखल केले आहे. वेळेत मदतकार्य झाल्याने जीवित हानी टाळणे शक्य झाले.