Category: कला/संस्कृती
-

‘बोम्मरिल्लू’मध्ये रमल्या पूर्व भागातील कन्या ; असं जपलं जातंय ‘घरकुला’शी नाते
महेश हणमे /9890440480 सोलापूर हा विविध जाती- धर्म पंथ तसेच वेगवेगळ्या संस्कृती जपणाऱ्या नागरिकांचा वैविध्यपूर्ण नटलेला जिल्हा आहे. सोलापूर शहरातील पूर्व भागात पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणावर वसलेला आहे. या भागातील नागरिक मोठ्या उत्साहाने तेलुगु संस्कृतीची जोपासना करतात. दिवाळीच्या कालावधीत तेलगू संस्कृतीतील बोम्मरिल्लू अर्थात भातुकलीचा खेळ मोठ्या उत्साहात मांडला जातो. पूर्वभागातील कन्या या खेळामध्ये चांगल्याच रमलेल्या…
-

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज;यंदाची दिवाळी होणार गोड
मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.…
-

आज लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी… जाणून घ्या महत्व
लक्ष्मीपूजन अश्विन मावशीच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करतात आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी अख्यायिका आहे. समुद्र आणि ऐश्वर्या यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. धने, गूळ, साळीच्या…
-

आज वसुबारस ; जाणून घ्या महत्त्व…
दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणले जाते. आनंदाची दिवाळी साजरी करण्याकरीता बाल गोपाळापासून अबालवृद्ध या सणाची वाट पाहत असतात. आज गुरुवारी वसुबारस सण सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे. वसुबारस हा दिवस साजरा करण्यामागे एक पुराणकथा सांगितली जाते. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी त्यातून पाच कामधेनुची उत्पत्ती झाली होती या कामधेनू मध्ये नंदा…
-

Live | जसं आहे तसं ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेसमोर मांडलेले मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेसोबत संवाद साधला. यावेळी अनेकांना ठाकरे आपल्या या भाषणात काय सांगतील याची मोठी उत्सुकता लागून राहिली होती. येऊ घातलेली दिवाळी, शाळा सुरू करण्याचा निर्णय, कोरोना संसर्ग, मंदिरे उघडण्याबाबत वाढणारी मागणी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हाला सुख-समाधानाची व आनंदाची जावो हीच प्रार्थना…
-

किमान मंदिराचे दरवाजे तरी उघडा ; वारकरी संप्रदायाने केली मागणी
पंढरपूर : शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करू परंतु आषाढी वारी प्रमाणे कार्तिकी यात्रेत मंदिर परिसरात संचारबंदी करू नका अशी मागणी शासन दरबारी महाराज मंडळींनी केली आहे. कार्तिकी वारी संदर्भात वारकरी संप्रदायाची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी रामकृष्ण वीर महाराज, राणा महाराज वासकर, भागवत महाराज चवरे, विष्णु महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापुरकर,…
-

मराठी रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडून रंगकर्मींना शुभेच्छा
मराठी रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्यातील रंगकर्मींना शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन राज्यभर विविध संस्थांकडून मोठ्या उत्साहाने, भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, जाहीर कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा करता येणार नाही, याचा खेद वाटतो. रंगकर्मींनी या काळात संयम दाखवत शासनाला पूर्ण सहकार्य…
-

हिंदुत्ववादी विचारवंतांचा स्नेह मेळावा उत्साहात
कोजागिरी पौर्णिमाचे औचित्य साधून श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेला हिंदुत्ववादी विचारवंतांचा स्नेह मेळावा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.शिवदासमय मंगल कार्यालय येथे शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आराध्यदैवत तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह शिवानंद कल्लूरकर व गो-रक्षक सुधीर बहिरवाडे यांनी गो-मातेचे…
-

एम.के.फाऊंडेशन तर्फे दिवाळी फराळाचे वाटप
सोलापूर : सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी शहरातील सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती सरसावल्या आहेत. गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनणार आहे. शहरातील एम.के.…
-

दिवाळीच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी, आकर्षक दिवे, पणत्या बाजारात दाखल
सोलापूर : दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, प्रकाशाचा झगमगाट. घराच्या दारापाशी, तुळशीजवळ लावण्यात येणा-या दिव्यांमुळे शहरात मंगलमय वातावरणाची प्रचिती येते. दिवाळीशी अतूट नाते असणारे हे दिवे बाजारात दाखल झाले आहेत. छोटय़ाशा, नाजूक, रंगीबेरंगी पणत्यांमुळे दिपोत्सव पूर्ण होऊच शकत नाही. दसरा झाल्यानंतर दुकानात विक्रीसाठी दाखल झालेले दिवे नजरेस पडत आहेत. दिवाळीच्या निमित्तानं बाजारात विविध डिझाईन, रंगसंगती, आकार,…