Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण
  • मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधला आष्टीच्या सरपंचाशी संवाद
  • जिल्हा परिषदेच्या कोरोनामुक्त गाव अभियानाचे कौतुक

सोलापूर, दि. ७ – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधून आमचा हुरूप आणखी वाढला अशी भावना आज सोलापूर जिल्ह्यातील सहा सरपंचानी व्यक्त केली. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
गाव कोरोनामुक्त ठेवणेसाठी राज्यातील विविध सरपंचानी आपआपल्या परीने उपक्रम राबविले आहे. पुणे, नाशिक व कोकण विभागात चांगली कामगिरी करणार्या काही सरपंचाशी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी सोलापुर जिल्ह्यातील डॉ. व्यवहारे यांनी संवाद साधला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आष्टी ता मोहोळचे सरपंच अमित व्यवहारे, गोपाळपूर ता पंढरपूरचे सरपंच विलास मस्के, चिंचणी ता पंढरपूरच्या सरपंच मुमताज शेख, जकापूर ता अक्कलकोटच्या सरपंच दिपाली आळगी, आंधळगाव ता मंगळवेढा चे सरपंच शांताबाई भाकरे, रहाटेवाडी ता. मंगळवेढा वर्षाराणी गोपाळ पवार उपस्थित होते.
डाॅ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी गावात राबविलेल्या उपायांबाबत माहिती दिली.
त्यांनी सांगितले, सोलापूर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माझ गाव कोरोना मुक्त गाव व गाव तिथे कोविड सेंटर ही संकल्पना सुरू केली. जिल्हा परिषदेने विविध पंधरा अभियाने दिली. त्यातून आम्ही गावातील सिल्हवर ओक स्कुल मध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. सेंटर सुरू झाले. त्यावेळेस ३५ पेशंट होते. या पेशंटना सेंटरचे बिल्कुल बाहेर जाऊ दिले नाही. यामुळे संक्रमणाला आळा बसला. त्याच बरोबर कोविड सेंटर मध्ये चांगले उपचार, सकस आहार आणि पेशंट ची मानसिक स्थिती चांगली राहिल तिकडे लक्ष दिले. मी डाॅक्टर असल्यामुळे मी देखील रूग्णांना तपासत होतो. जिल्हा परिषदेच्या वतीने माझे गाव कोरोना मुक्त गाव अभियान सुरू केले. या मध्ये आम्ही टेस्टींग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर केला. जिल्हा परिषेदेच्या अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती विजयराज डोंगरे यांची ग्रामीण कोविड सेंटर उभारणी साठी चांगली मदत झाल्याचे डाॅ. व्यवहारे यांनी सांगितले.

कोरोनामुक्त गावांना भेटी देणार – स्वामी

सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुक्त सहा गावांना प्रामुख्याने भेटी देऊन त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. ज्या सरपंचानी यांत योगदान दिले आहे. ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
कोरोनामुक्त गाव अभियानाचा चार वेळा नामोल्लेख

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून माझा गाव कोरोना मुक्त गाव अभियान सुरू केले. त्याची दखल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या भाषणात केली होती. जनतेला संबोधत असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा गौरव केला होता. त्यानंतर माझ गाव कोरोना मुक्त गाव अभियान राज्यात सुरू करणार असल्याचे जाहीर करून शासन निर्णय काढला. सरपंचाशी आज संवाद साधून त्यांनी कोरोनामुक्त गाव अभियानाचा चार वेळा नामोल्लेख केला. हे अभियान प्रभावीपणे राबविणेचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *