Big9news Network
मद्यपान करून महापालिकेच्या साधू वासवानी येथील विभागीय कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या लिपिकाला आयुक्त पी. शिवशंकर यांनी निलंबित केले.
एस. एन. गदलवालकर असे या लिपिकाचे नाव आहे. विभागीय कार्यलाय 5 येथे वरिष्ठ क्लर्क एस.एन. गदवालकर हे कार्यलायी वेळेत दारू पिऊन कार्यालयात गोंधळ घालत असताना त्या ठिकाणीची माहिती आयुक्त पि.शिवशंकर तसेच सामान्य प्रशासन विभागाला मिळाली.
गदलवालकर हा गुरुवारी दुपारी साधू वासवानी झोन ऑफिसमध्ये गोंधळ आणि शिवीगाळ करीत असल्याचे आयुक्तांना कळाले. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर थेट झोन ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांना गदलवालकर, यांच्याकडील कामे प्रलंबित असल्याचे दिसून आले. त्यांच्या कपाटाची किल्ली मागण्यात आली. ही किल्ली घरी असल्याचे गदलवालकर यांनी सांगितले. मस्टर तपासणी केली असता मस्टरवर स्वाक्षरी करून ते नेहमी घरीच जात असल्याचे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आयुक्तांनी या लिपिकाची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले. सायंकाळी निलंबित करण्याचा आदेश काढला. शिवाय गदलवालकर यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आले. आयुक्त यांनी वरिष्ठ क्लर्क एस .एन गदवालकर याना निलंबित केलं आहे.
Leave a Reply