Big9 News
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुंभकर्णाच्या झोपी गेलेल्या निगरगट्ट महापालिका प्रशासनाला जागी करण्यासाठी सोलापूर शहरातील दूषित पाणीपुरवठा आठ दिवसाआड होणारा अवेळी पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणी देऊन सोलापूर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील विविध विषयाला धरून उपरोक्ष हार बनवून महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारास घालून मनसेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
.गेल्या पंधरा दिवसापूर्वी महानगरपालिका प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे सोलापूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्येसाठी महापालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे इशारा दिला होता परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही त्यामुळे गेल्या चार दिवसा खाली सोलापूर शहरातील लहान कवळ्या बालकांचा मृत्यू झाला तसेच काल विजापूर रोड येथे नागरिकांच्या पाण्यामध्ये आळ्या असलेल्या दूषित पाण्याने त्यांच्या जीवास धोका झाला .जलतरण तलावाची सुद्धा दुरावस्था झाल्या कारणाने लहान मुलांना उन्हाळ्याचा आनंद घेता येत नाही या विषयाला धरून मनसेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दिन शेख, विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हा अध्यक्ष अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना संघटक प्रसाद कुमठेकर, शहर संघटक जितू टेंभुर्णीकर, गोविंद बंडपत्ते, पवन देसाई, यश महिंद्रकर, वैभव रंपुरे, गणेश पवार, राहुल अक्कलवडे, रुपेश बारड, सुमित अंबुरे, संतोष बारटक्के, सैपन जमखंदी, आदित्य महिंद्रकर व असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थीत होते.
Leave a Reply