सोलापूर शहरात कोरोना ने 16 जणांचा मृत्यू; तर नवे बाधित 252

सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा, एकाच दिवशी कोरोनाने तब्बल 16 जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.17 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 252 रुग्ण आढळले असून यामध्ये 148 पुरुष तर 104 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 3524 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 3272 निगेटीव्ह तर 252 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 110 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.