सोलापूर प्रतिनिधी
विजापूरर नाका पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने दोन संशयीत चोरट्यांना अटक केले आहे.दोन्ही संशयीत चोरट्यांकडून 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या मुद्देमालात 71 ग्रॅम सोने,एक मोटारसायकल,तीन गॅसटाक्या व रोख रक्कम असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजापुर नाका पोलीस ठाण्याचे डीबी पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते.एका खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली,घरफोडी मधील संशयीत दोन्ही आरोपी हे विजापुर नाका हद्दीत आहेत.या माहितीनुसार पोलिसांनी ताबडतोब दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोन्ही संशयीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडी आणि इतर गुन्ह्यांची माहिती दिली.पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षण उदयसिंह पाटील, अजय जगताप,सपोनि शितलकुमार कोल्हाळ,सफौ संजय मोरे, राजकुमार तोळनुरे, शावरसिध्द नरोटे, श्रीरंग खांडेकर, प्रकाश निकम, इम्रान जमादार आदींनी केली.