Big9news Network
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ‘शारदा प्रतिष्ठान, सोलापूर ‘ संचलित सायकल लवर्स ग्रुप कडून रविवार दिनांक २३ मार्च रोजी “सोलापूर सायक्लोथोन 2022” चे आयोजन करण्यात आले आहे. सायकल लव्हर्स सोलापूर यांचे कडून दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही स्पर्धा वर्च्युअल स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे.
सदर स्पर्धेमध्ये १०किमी, २५किमी, ५०किमी, ७३ किमी अंतराच्या राईड ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी ज्या कॅटेगरीमध्ये भाग घेतला आहे तेवढे अंतर आपल्या परिसरात प्रशासनाने कोविड संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत सायकलवर पूर्ण करावयाचे आहे. याचे रेकॉर्डिंग strava किंवा तत्सम ॲप वर रेकॉर्डिंग करून सायकल लवर्स सोलापूर यांचेकडे पाठवायचे आहे. हे अंतर पूर्ण करणाऱ्या सायकलपटूस सायकल लवर्स यांचेकडून मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला फिटनेस चांगला राहावा आणि पर्यावरणाचे देखील संवर्धन व्हावे या हेतूने सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून वर्षभर सायकलिंग बाबत आवड निर्माण होण्ासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. दर रविवारी स्पेशल राईड आयोजित केली जाते. ज्यात सोलापुरातील विविध भागातील सायकलप्रेमी उत्साहाने सहभागी होतात. शिवाय पायी शाळेत येणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकली वितरित केल्या जातात.
या स्पर्धेमध्ये सोलापूर व परिसरातील सायकलिंग व फिटनेस ची आवड असणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन सायकल लव्हर्स सोलापूरचे समन्वयक श्री.महेश बिराजदार, इंजि. श्री अमेय केत, श्री अविनाश देवडकर, डॉक्टर प्रविण ननवरे यांनी केले आहे.
इच्छुकांनी 9373105481 या क्रमांकावर संपर्क करावा.
Leave a Reply