Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

सोलापूर  राज्यातील पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांना कायम करण्याची मागणी करत शासकीय कर्मचारी यांचे जुनी पेन्शन योजने साठी सुरू असलेल्या संपास पाठी्बा दिला आहे.
जिल्हा परिषदेमध्ये आज सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत विभाग व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांना महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , मनुष्यबळ विकास तज्ञ शंकर बंडगर ,संवाद तज्ञ सचिन सोनवणे , क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे , स्वच्छता तज्ञ प्रशांत दबडे , पाणी गुणवत्ता तज्ञ दिपाली व्हटे , अभियांत्रिकी तज्ञ मुकूंद आकुडे , सनियंत्रण व मुल्यमापन तज्ञ यशवंती धत्तुरे , प्रतिक्षा गोडसे , वित्त नि संपादणूक तज्ञ अर्चना कणकी उपस्थित होते.
या निवेदनामध्ये राज्यातील पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे जिल्हा कक्षातील सल्लागार व बीआरसी व सीआरसी हे गेल्या १८ वर्षा पासून काम करीत असून यांना शासन सेवेत कायम करणेची मागणी करणेत आली आहे. गेल्या तीन वर्षात कर्मचारी यांचेवर अन्याय करण्यात येत आहे.

या निवेदनाची प्रत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पाठविण्यात  आली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी निवेदन देताना कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , मनुष्यबळ विकास तज्ञ शंकर बंडगर ,संवाद तज्ञ सचिन सोनवणे , क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे , स्वच्छता तज्ञ प्रशांत दबडे , पाणी गुणवत्ता तज्ञ दिपाली व्हटे , अभियांत्रिकी तज्ञ मुकूंद आकुडे , सनियंत्रण व मुल्यमापन तज्ञ यशवंती धत्तुरे , प्रतिक्षा गोडसे , वित्त नि संपादणूक तज्ञ अर्चना कणकी दिसत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *