Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

MH13 News Network

            मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू सलीम दुर्रानी यांच्या निधनाची बातमी समजून दुःख झाले. त्यांच्या खेळाने भारतीय जनमानसाला क्रिकेटचे वेड लावले होतेअशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतातआज क्रिकेट विश्वात भारताने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहेहे स्थान प्राप्त करण्यात ज्या क्रिकेटपटूंचे योगदान लाभलेत्यात सलीम दुर्रानी यांचे स्थान अग्रस्थानी आहे. प्रेक्षक षटकाराची मागणी करत आणि ते चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून देत. त्यांच्या निधनाने क्रिकेट क्षेत्राचा एक मोठा मार्गदर्शक हरपला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवोहीच प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *