MH13 News Network
लोकमंगल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर
गावडी दारफळ : श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय वडाळा यांच्यावतीने मौजे ग्रामपंचायत गावडी दारफळ येथे सात दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रा. श्रीकांत धारूरकर हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना जा धारूरकर म्हणाले की, स्वयंप्रेरणा,स्वयंशिस्त , अभ्यासातील सातत्य, व्यस्त कार्यशैली आणि सामाजिक संवेदनशीलता या पंचसूत्री तून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वाचे विकसन करायला हवे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्वाचे विकसन हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालये विद्यापीठ करत असतात. जगातील सर्वच महापुरुषांनी भौतिक जगतात विद्यार्जन व कौशल्य विकसन याला महत्व दिल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपला वेळ ज्ञानार्जन,संशोधन, कौशल्य विकसन आदींमध्ये खर्च करावा असे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी शक्य तितके सामाजिक माध्यमांपासून दूर राहून सामाजिक संवेदनाची जाणीव करून घेणे गरजेचे असल्याचे मत प्रतिपादित केले.
विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा कदम यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रा. डॉ. किरण जगताप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. समाधान कदम, प्रा. सुजाता देवकर प्रा भारती जाधव श्री संजय कदम आणि शिबिरार्थी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.