Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे माजी सभापती देवीदास पोलके यांची शुक्रवार दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता रंगभवन येथील समाज कल्याण केंद्रात शोकसभा आयोजित केली आहे.

देविदास पोलके (वय 75) यांचे 26 मार्च रोजी आकस्मिक निधन झाले आहे. देविदास पोलके यांनी 10 वर्ष सोलापूर जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती, 10 वर्ष कोल्हापूर विद्यापीठाचे सिनेट मेंबर, 5 वर्षे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक अशा अनेक पदांवर धडाकेबाज कामगिरी केली होती.

पोलके मित्र परिवाराच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता रंगभवन परिसरातील समाज कल्याण केंद्रात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे ज्ञानेश्वर जावीर (निवृत्त शिक्षणाधिकारी), बाबुराव इंगळे (निवृत्त शिक्षक), पांडूरंग सोनकांबळे (निवृत्त जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा चौकशी अधिकारी मंत्रालय मुंबई) यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *