Big9 News
सोलापूरच्या आडके हॉस्पिटलच्या डॉ. डायना आडके यांना फ्रान्सच्या थेम्स विद्यापीठाची हेल्थकेअर व हॉस्पिटल मॅनेजमेंट मधील मानद डॉक्टरेट प्रदान.*
सोलापूर: नुकत्याच गोवा येथील पार्क रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोलापूरच्या आडके हॉस्पिटलच्या व्यवस्थापक डॉक्टर डायना आडके यांना पॅरिसच्या थेम्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची ‘हेल्थकेअर व हॉस्पिटल मॅनेजमेंट’ मधील डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी ही मानद पदवी इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. टी एन.सुरेश कुमार व डॉ. जिमी जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
डॉ. डायना आडके यांनी आडके हॉस्पिटल सोलापूर येथे गेल्या तेरा वर्षात हॉस्पिटल व्यवस्थापनामध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांना ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यावर्षी संपूर्ण भारतातून हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयांमध्ये फक्त डॉ. डायना आडके यांनाच ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे ही सोलापूरच्या नावलौकिकात भर पाडणारी गोष्ट आहे.
त्यांच्या या कामामुळे आडके हॉस्पिटल तसेच इतर वैद्यकीय संस्थांना त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल असे दी फर्स्ट चर्चचे रेव्ह. फादर विकास रणसिंगे हे त्यांचे अभिनंदन करताना म्हणाले.