MH 13 News Network
सोलापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शहर शाखेच्या महिला विभाग प्रमुख डॉ अस्मिता बालगाकर यांना अहमदपूर येथील समाजप्रबोधिनी पुरस्कार जाहीर झाला आहे.
महिला सक्षमीकरण ,जटामुक्ती आंदोलन ,महिलांचे हक्क, बालविवाह विरोधी ऑप्रेशन परिवर्तन अभियान ,वैज्ञानिक जाणीवा जागृती आदी कार्यक्रमात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मान चिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्या गेल्या वीस वर्षापासून सायकोलाँजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. जिव्हाळा ,मतीमंद मुलांची शाळा या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. उत्कृष्ट वकत्या म्हणून त्या परिचित आहेत.
या यशाबद्दल शहर शाखेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ राजेद्रसिंह लोखंडे, कार्याध्यक्ष व्ही.डी गायकवाड ,आर.डी गायकवाड , सचिव लालनाथ चव्हाण,केदारीनाथ सुरवसे,अँड सरिता मोकाशी,ब्रम्हानंद धडके, निशा भोसले,उषा शहा, अंजली नानल ,मधुरा सलवारु ,शंकुतला सुर्यवंशी, सनी दोशी,डॉ निलेश गुरव,शारदुल भालेराव ,मिलिंद गायकवाड, गोरख सांगळे यांनी अभिनंदन केले आहे.