Big9 news Network
राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड19 साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्स इतर लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ई-पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी उद्यापासून महापालिकेच्या वेबसाईटवरती हॉटेल, ई-कॉमर्स, यांच्या आस्थापना विभागाच्या संबंधितांनी ऑनलाइन अर्ज करावे.त्याची अंमलबजावणी सोमवार पासून करण्यात येणार आहे. असे सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
अर्ज करत असताना त्या व्यक्तीचा फोटो, आधार कार्ड व rt-pcr चाचणी केलेली निगेटिव्ह सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. रजिस्टर झाल्यानंतर आपल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर 1 तासात पास देण्यात येईल. ई-पास करिता कुठेही जाण्याची गरज नाही त्यांनी फक्त महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
ज्यांच्याकडे ई. पास आहे त्यांनाच फिरत येईल. ई-पास ज्यांच्याकडे नाही त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली आहे.
www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर वरच्या बाजूला E-pass application for home delivery या लिंक वर क्लिक करावे