Big9 News
सामाजिक न्याय पर्व अभियानास प्रारंभ
देशात महात्मा फुले याचे शैक्षणिक योगदान खुप महत्वपुर्ण आहे असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जिल्हा परिषद अंतर्गत समाजकल्याण विभागाचे वतीने सामाजिक न्याय पर्व अभियानाचे दि. १ एप्रिल ते १ मे या कालावधीत आयोजन करणेत आले आहे. आज महात्मा फुले यांचे जयंतीनिमित्त अवयव दान या विषयावर वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डी जी बंदीछोडे यांचे अवयव दान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी महात्मा फुले यांचे प्रतिमेचे पुजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांचे हस्ते करणेत आले.
या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, डाॅ. वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाचे डॉ. डी जी बनसोडे, डॉ. एस. टी. बंदीछोडे, डॉ. गायत्री चक्रे, समाजसेवा अधिक्षक महेंद्र साळवे, कास्टाईब संघटनेचे अरूण क्षीरसागर, अविनाश गोडसे, प्रमुख उपस्थित होते.
डाॅ. वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाचे डॉ. डी जी बनसोडे, डॉ. एस. टी. बंदीछोडे, डॉ. गायत्री चक्रे, समाजसेवा अधिक्षक महेंद्र साळवे यांचे स्वागत सिंईओ दिलीप स्वामी व समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी केले. या प्रसंगी समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनावर विचार व्यक्त केले. विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड, वरिष्ठ सहाय्यक शशीकांत ढेकळे, श्रीमती हिरेमठ यांनी सामाजिक न्याय पर्व अभियान यशस्वी करणे साठी प्रयत्न केले आहेत.
या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अवयव दान करणेचे आवाहन केले. नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयास आपण स्वतः अर्ज देऊन अवयव दान करण्याची प्रतिज्ञा केली आहे. जिल्हयात अवयव दानाची चळवळ सुरू करा.
प्रत्येक नाविण्यपुर्ण योजनेची शासना कडून दखल- सिईओ दिलीप स्वामी
सोलापूर जिल्ह्यात विविध नाविण्यपुर्ण योजना जिल्हा परिषदेचे माध्यमातून राबविले. या राबविलेले योजनांचे शासन निर्णय काढून शासनाने याची राज्यात अंमलबजावणी केली. या पैकी माझे गाव कोरोना मुक्त गाव, सदृढ बालक जागृत पालक अभियान, माझे मुल माझी जबाबदारी, सुंदर माझा दवाखाना असे विविध उपक्रम राज्यात राबविणेत येत आहेत ही समाधानाची बाब आहे.असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
अवयव दान करा, इतरांना जीवदान द्या – डाॅ. बंदीछोडे
अवयव दानाची लोकांना माहिती नाही. अवयव दानामुळे अनेक बालकांना दृष्टी मिळू शकते. देशात ०.०१ टक्के लोक अवयव दान करतात. अंध बालकांमध्ये ६० टक्के बालकांना नेत्रदानाची आवश्यकता आहे. हे प्रमाण १२ वर्षाचे मुलांमध्ये खुप आहे. त्यांच्यासाठी नेत्रदान झालेस दृष्टी मिळू शकते. मृत्युनंतर सहा तासात नेत्रदान करू शकतो. असेही डाॅ. बंदीछोडे यांनी बोलताना सांगितले. डोळे, त्वचा, किडनी, रक्त, नेत्रदान करू शकता.
सिईओ स्वामींचा अवयवदानासाठी अर्ज
सिईओ दिलीप स्वामी यांनी नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात तीन वर्षा पुर्वीच मरणोत्तर अवयव दान करणेसाठी फाॅर्म भरून दिला आहे. मृत्युनंतर देखील आपल्या शरीरातील अवयवाचा उपयोग समाजातील गरजू लोकांना झाला पाहिजे. उजव्या हाताने केलेले दान डावे हाताला कळू नये अशी महत्व आहे मात्र आपण दानाची देखील माहिती दिली पाहिजे तरच लोक पुढे येतीस. मी सायकल बॅंके साठी स्वतःहून २५ हजार चा धनादेश निमगाव शाळेस दिला त्यानंतर शेकडो लोक सायकल दानासाठी पुढे आले. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.