Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

माढा तालुका प्रतिनिधी

चिंचोली ता माढा येथील सरपंच शीतल देवकुळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी व एक वर्षाच्या कालावधीसाठी पंचशीला महावीर आखाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक अधिकारी लऊळ गणातील सर्कल अधिकारी सुजित शेळवणे व ग्रामसेवक रेणुका कांबळे यांनी काम पाहिले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा लोंढे,आशा चव्हाण,राजाबाई लेंडवे,राहुल लोंढे,सुधीर देवकर,प्रवीण टोंगळे,डॉ विजयकुमार लोंढे,अमोल लोंढे,राजाभाऊ लोंढे,शरद पाटील, ज्योतीराम लोंढे,विलास लोंढे,सचिन लोंढे,रामहरी लोंढे,सोमनाथ लोंढे, भिकाजी लोंढे अशोक आखाडे डॉ.जानराव, भिमराव साळवे विजय साळवे, महेश्वर कांबळे विठ्ठल कांबळे बालाजी आखाडे उपस्थित होते.

पंचशीला आखाडे ह्या सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या भगिनी आहेत,सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांची बहीण गावचा सरपंच ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे,या निवडीने त्यांचे चिंचोली व चिंचोली परिसरातून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. व त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पंचशीला महावीर आखाडे या महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे महावीर आखाडे यांच्या सौभाग्यवती आहेत.महावीर आखाडे हे पुणे विभागाचे शिक्षक मा आमदार दत्तात्रय सावंत यांचे ते अत्यंत निकटवर्तीय समजले जातात.यावेळी मा आमदार दत्तात्रय सावंत,महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे दत्तात्रय ननवरे,समाधान घाडगे,गजानन लावर, राजेंद्र माळी,बापूसाहेब अडसूळ, हरिचंद्र गाडेकर,सदाशिव पवार, महादेव पवार,अनिल वाघमारे,राहुल मोरे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *