Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

BIG9 NEWS,Network

मोटारसायकलवरून घरी सोडण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे.या प्रकरणी मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. त्या घटनेतील संशयित आरोपींना आणि इतर सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ..

मोटरसायकलवरून घरी सोडण्यावरून झालेल्या भांडणात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपींना आणि इतर सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

गुरुराज थिटे ,सुमित ढवळे, दत्तात्रेय थिटे ,विक्रांत शेंडगे ,प्रमोद जाधव, हे या आधी अटकेत होते तर अमर कांबळे ,प्रवीण सूर्यवंशी, आकाश थिटे, प्रताप सूर्यवंशी ,सुरज थिटे ,समाधान थिटे ,यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.या अकरा जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस जगताप यांनी जामीन दिला आहे याबाबत सोलापुरातील मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणातील फिर्यादी व गुरुराज यांच्यात मोटारसायकलवरून घरी सोडल्यावर ऊन शिवीगाळ केल्याची तसेच केबलद्वारे मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिली होती.

या प्रकरणातील एकूण बारा आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता आरोपीतर्फे M.A.इनामदार,मुन्ना तळे, वसीम डोंगरी या वकिलांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *