Big9news Network
युवतीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी 1)दत्तात्रय भागवत कोंढारे,वय:-29,रागिनी भागवत कोंढारे,वय:-23, सोमनाथ भागवत कोंढारे,वय:-20, सीताबाई भागवत कोंढारे,वय:-60, भागवत दगडप्पा कोंढारे, वय:-72, सर्व रा:- तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेला खटल्याची सुनावणी बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस.डी.अग्रवाल साहेब यांच्या समोर होऊन त्यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, पिडीता व यातील आरोपी रागिनी या एकमेकांच्या मैत्रिणी होत्या व आरोपी रागिनी हिचा भाऊ दत्तात्रय हा पीडितेवर प्रेम करीत होता व त्याने तिस आमच्या घरच्या लोकांची आपल्या लग्नास संमती असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडिता ही शिक्षणासाठी परगावी गेली असता दत्तात्रय याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दुष्कर्म केले तसेच इतर आरोपींनी पीडितेचे व आरोपी दत्तात्रय यांचे लग्न लावून देतो असे आमिष दाखवले अशा आशयाची फिर्याद पीडितेने पांगरी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात पीडितेचा कोर्टात झालेला उलटतपास न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला त्यावरून जबरदस्तीने दुष्कर्म झाले असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ऍड.मिलिंद थोबडे, ऍड.निखिल पाटील तर सरकारतर्फे ऍड.पी.ए. बोचरे यांनी काम पाहिले.