Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..
  • 5 व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म प्रदर्शनाच्या घोषणापत्राचे लॉचिंग नितीन गडकरी यांच्या हस्ते थाटात संपन्न
  • देशभरातील गारमेंट उत्पादकांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवावा
  • उत्पादन खर्च कमी करून इ मार्केटिंग वर भर दया
    नितीन गडकरी

सोलापूर:(प्रतिनिधी)
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा संकल्प आहे की 2030 पर्यंत संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची ओळख एकसमान सोर्सिंग हब म्हणून करायची आहे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी याचा फायदा होईल.
2019 च्या 2 वर्षांनंतर, कोविडमुळे गणवेश क्षेत्रात मोठी मंदी आली होती, परंतु आता 2022 मध्ये कोविडचे पुरावे कमी झाल्याने सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने हे लक्षात घेऊन हैदराबादमध्ये पाचव्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.


या प्रदर्शनाला प्रथमच ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय देश म्हणजे जगातील १२% देश उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे, या प्रदर्शनाच्या ब्रँडिंगसाठी,रविवारी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा टीझर लॉन्च करण्यात आला.यावेळी गडकरी बोलत होते,याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख,सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे उपाध्यक्ष सतीश पवार,राजू कोचर,अमित जैन,प्रकाश पवार,अजय रंगरेज यांची प्रमुख उपस्थिती होती,

दरम्यान
या प्रदर्शनात संपूर्ण भारतातून 250 हून अधिक गणवेश उत्पादक सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्यांचे मनोबल खूप वाढेल. या प्रदर्शनाला मोठ्या ब्रँडिंगची आवश्यकता असेल.
जगातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते टीझर लाँच केल्याने या कामगिरीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग होईल आणि सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होईल अशी आशा सोलापूर गारमेंट असोसिएशनचे संचालक अमित जैन यांनी व्यक्त केलं.

यावेळी पुढे बोलताना रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,
गारमेंट उत्पादनासाठी लागणारे कच्चा माल सोलापुरातच उत्पादन करावे तसेच कापड देखील सोलापूरमधूनच तयार करावे जेणेकरून इथे रोजगार उपलब्ध होईल आणि युनिफॉर्मचे उत्पादन खर्च कमी होईल यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहू,त्याचप्रमाणे सोलापूर गारमेंटच्या उत्पादनांची इ मार्केटिंग करावे एका क्लिकवरून सोलापूरच्या उत्पादनांची माहिती जगभरात पोहोचले असंही नितीन गडकरी म्हणाले.
उत्पादन घेताना नेहमी नवीन प्रकारचे प्रोडक्ट घेण्यावर भर दयावे यासाठी एक डीझाइन सेंटर सुरू करावे असा सल्लाही गडकरी यांनी दिला.
सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ एखादी जागा मिळाल्यास तिथे वेअर हाऊस तयार करून तेथूनच एक्स्पोर्ट करता येईल त्यामुळे तुमचा वाहतूक खर्च वाचेल यासाठी प्रयत्न करावे असंही गडकरी यांनी सांगितले.
यावेळी गारमेंट उत्पादक उपस्थित होते.

हैद्राबाद येथे नोव्हेंबर 2022 साली होणाऱ्या 5 व्या गारमेंट प्रदर्शनात देशभरातील गारमेंट उत्पादकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *