Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

बार्शी उपसा सिंचन योजनेच्या २०२४ पर्यंत पूर्ण होणाऱ्या सर्व कामांच्या ३५०कोटी रुपयांच्या कामास राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी सुप्रमा दिली असल्याची माहिती माजी मंत्री दिलीप सोपल यांनी दिली आहे

सोपल यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, बार्शी उपसा सिंचन योजना या महत्वकांशी प्रकल्पाची कामे निधीअभावी रखडली होती. या कामांमधील योजनेची परीपूर्णता होण्यासाठी सुमारे साडे तीनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता . नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशन काळात जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील याना समक्ष भेटून या सुप्रमा देणे बाबत विनंती केली होती . यावेळी आ बबन दादा शिंदे उपस्थित होते .या उपसा सिंचन योजनेचे उद्दिष्ट असणारे क्षेत्र ओलिताखाली येणे साठी योजना पूर्ण होण्याची गरज सांगीतली होतो

या मध्ये खालील कामाचा अंतर्भाव असल्याचे सोपल यांनी सांगितले ९६.२९ कोटी भूसंपादन साठी एकुण क्षेत्र ९५.६१ हेक्टर,
टप्पा-१ व २ पंपगृह व उद्धरण नलिका उर्वरित कामे १०.०४ कोटी, टप्पा-१ व २ पंपगृह यांत्रिकी कामे कालवे, टप्पा-१ उजवा मुख्य कालव्यावरील उर्वरीत कामे, टप्पा-१ डावा कालव्यावरील उर्वरीत मातीकाम व बांधकामे.४.६७ कोटीची टप्पा-२ उजवा कालव्यावरील मातीकाम, बांधकामे व अस्तरीकरण व बंद नलिका प्रणालीची काम,१७३.६५ कोटीची वितरण व्यवस्था टप्पा-१ उजवा मुख्य कालव्यावरील बंद नलिका वितरण व्यवस्था एकूण क्षेत्र ४०७० हेक्टर,३५.८४ कोटी टप्पा-१ डावा कालव्यावरील बंद नलिका वितरण व्यवस्था क्षेत्र २२३० हे,१५.७१ कोटी टप्पा-२ उजवा कालव्यावरील बंद नलिका वितरण व्यवस्था क्षेत्र ८७०० हे ,इतर कामे व अनुषंगिक खर्च ७०.४६ असे एकूण ३५० कोटी चा सुप्रमा प्रलंबित होता.

याकामी राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांचेही सहकार्य लाभले . यापुढे मंजूर सुप्रमा प्रमाणे निधी साठी प्रयत्नशील राहुन प्रशासनाच्या अहवाला प्रमाणे २०२४ पर्यंत कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सोपल यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *