Big9news Network
सोलापूर जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपदी कारकीर्द उत्कृष्टरित्या बजावणारे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असणारे उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते बळीराम साठे यांनी आज आपल्या जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बळीराम उर्फ काका साठे यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले आहे. वयाच्या ज्येष्ठतेनुसार आता कामाची दगदग होत नाही असे जरी कारण सांगितले असले तरी जिल्हा परिषद मध्ये पडलेले गट काकांच्या राजीनाम्याला कारणीभूत असल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये सुरू होती. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, काका साठे यांचा राजीनामा स्वीकारणार का हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
Leave a Reply