Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

सोलापूर शहरातील शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष हरिदास धनाजी चौगुले यांची नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे. शिवसेनेच्या सचिवांनी त्यांची निवड केली असल्याचे पत्र आज बुधवारी देण्यात आले. यावेळी शिंदे गटात नव्याने प्रवेश केलेले पदाधिकारी उपस्थित होते.

हरिदास चौगुले यांची शिवसेना पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी (कार्यक्षेत्र- सोलापूर शहर तालुका उत्तर सोलापूर, मंगळवेढा) नियुक्ती करण्यात येत असून नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असा मजकूर चौगुले यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आला आहे.


एकनाथ शिंदे यांनी केलेल्या अभूतपूर्व बंडानंतर सोलापुरी शिवसेनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांना हत्तीचं बळ पुरवण्याचे काम माढ्याच्या सावंत बंधूंनी केले. छत्रपती संभाजीराजे चौकातील शिवशक्ती हॉटेलचा परिसर सावंत सरांचा आवडता कट्टा बनत आहे. प्राध्यापक शिवाजी सावंत यांची नेहमी येथे मोजक्या कार्यकर्त्यांसह वर्दळ असते. विशेष म्हणजे शिवाजी सावंत यांचे विश्वासू  म्हणून हरिभाऊ चौगुले यांची ओळख निर्माण झाली आहे.

शिंदे गटात नव्याने सामील होणाऱ्या शिवसेनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करण्यामध्ये चौगुले यांचा मोलाचा वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *