आज दि.15 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 717 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
एकाच दिवशी 16 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.
आज गुरुवारी 15 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 717 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 420 पुरुष तर 297 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 453 आहे. यामध्ये 299 पुरुष तर 154 महिलांचा समावेश होतो. आज 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 5102 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4385 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.