Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

     जुनी पेन्शनसाठी समितीच्या आदेशाची होळी 

सोलापूर  जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात गठीत केलेल्या समितीच्या निवडीच्या पत्राची होळी करण्यात आले तसेच या होळीच्या भोवती बोंब ठोकली. त्या समितीच्या निषेध करण्यात आला .
जिल्हा परिषदेच्या आवारात बुधवारी शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी व कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी संपाचा दुसरा दिवस पाळण्यात आला या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी महिला कर्मचारी अश्विनी शिंदे, उषा भोसले, सविता मिसाळ, आरती माडेकर, राजश्री कांगरे, भारती चव्हाण, सुनिता भुसारे, फर्जाना शेख, सुचिता जाधव, अश्विनी घोडके, अंजली पाटील, श्रीमती रांजणे, काळे , मंजिरी घोडके, छाया क्षीरसागर, अनिता तुपारे, अंजली पेठकर, ज्योती लामकाणे, ममता काशेट्टी, मृणालिनी शिंदे, श्रीमती पंगुलवाडे, सुजाता कांबळे, ज्योती काटकर, अनुपमा पडवळे, नंदा तरटे, शमा तांबोळी, रेखा राजगुरू, स्वपर्णिका लिंगराज, लक्ष्मी शिंदे, अंजली पेठकर, प्रज्ञा कुलकर्णी, अंजली पाटील, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, गिरीष जाधव, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, श्रीकांत मेहरकर, योगेश हब्बू, विशाल घोगरे, अनिल जगताप, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, मोहित वाघमारे, एस पी माने, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, मुकूंद आकुडे, महादेव शिंदे, गणेश हुच्चे, अंनिल पाटील, आप्पाराव गायकवाड, उपस्थित होते. यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
जुनी पेन्शन लागू करा, वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करा, मागास वर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती देणे अशा विविघ मागण्यांचा आक्रोश करण्यात आला.
गोलाकार पध्दतीने उभे राहून कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करणे साठी नेमणेत आलेल्या समितीची होळी करणेत आली. बक्षी समितीने केलेल्या शिफारशी यापुर्वीच कर्मचारी यांचेवर अन्याय करणारे आहेत. पुन्हा बक्षी यांना समितीवर घेतल्यामुळे कर्मचारी यांच्या मध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *