Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9News Network

हाॅरिझन एज्युकेशन ट्रस्ट, सोलापूर यांच्या वतीने दिनांक 22/05/2022 रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये साधारणपणे ड्रॉइंग, पेंटिंग, ग्रेन स्टीकिंग, हँडरायटिंग आणि राईम्स या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोलापूर शहरातून विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. त्याच स्पर्धांचे बक्षीस वितरण दिनांक 31 मे 2022 रोजी के आर कोचिंग क्लासेस ,सैफुल येथे माजी पोलीस उपनिरीक्षक सुनील घाडगे व कला शिक्षिका कु. संध्या मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

याच दिवशी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्याच्या त्या अंगी असणारे विविध कला गुण तसेच सृजनशीलता यांना व्यासपीठ मिळवून देणारी आर्ट अँड क्राफ्ट ची कार्यशाळा कला शिक्षिका कु. संध्या मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन वारंवार करण्यात यावे अशी विनंती पालक वर्गातून करण्यात आली.
बक्षीस वितरण कार्यक्रमांस लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री.सुनील घाडगे यांनी पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे असा कानमंत्र दिला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या आवडीतून आपले छंद जोपासण्यात साठी तसेच त्यामध्ये उच्च शिखर गाठण्यासाठी चिकाटी आवश्यक असल्याचे कला शिक्षिका संध्या मोहिते यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. नंदकुमार स्वामी यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार तसेच तंत्रज्ञानानुसार स्वतःला नवीन ज्ञान मिळविण्यासाठी सतत कार्यशील बनवावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सविता पाटोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. राधिका घाटगे व कार्यक्रमाचे संयोजन श्री.सुरज चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *