Big9 News
राज्यातील कांद्याचा दर भाव दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे दरात फार मोठी घसरण होत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलयं .कांद्याबरोबरच कोथिंबीर, मेथीला देखील दर मिळत नाही. दिवस रात्र कष्ट करूनही शेतकऱ्यांना कोथिंबीर आणि मेथी फुकटच वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे शेतातील कष्ट आणि शेतमालाला न मिळणारा भाव हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत आंदोलन सुरू केल आहे शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र स्वेच्छा मरणासाठी लिहून दिलं शेतकऱ्यांचा विचार करणारा कुणीच नाही असा सवाल ही शेतकऱ्यांनी उपस्थित केला कांद्याला तर भाव नाहीच पण मेथी कोथिंबीर उत्पादकांची सुद्धा अशी हालत आहे असंच जर होत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं,शेतकरी मेटाकुटीला आला आहे
अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू होतील. अशी माहिती गुरुवारी दोन मार्च रोजी विधिमंडळात दिली होती असं असतानाही बाजार समिती त्यांना याबाबत काहीही कळवलेलं नाही अजूनही समितीकडून खरेदी नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
तूर्तास महा किसान वृद्धी ऍग्रो प्रोडूसर कंपनीकडून कांद्याची खरेदी सुरू आहे शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे. की, कांद्याची खरेदी तरी या समित्यांकडून कधी होणार! उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन देऊनही अजून बाजार समिती यांची खरेदी नसल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त आहे.कांद्याची दर दिवसात होणारी घसरण पाहून वरून सरकारकडून कांद्यावरही कर लावला जात आहे.
एकीकडे बाजार समित्यांची खरेदी सुरू नसताना दुसरीकडे बाजार समिती जी खरेदी करणार आहे तो कांदा केवळ 55 ते 70 मिलिमीटर आकाराचा असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंच झाल्या आहेत आत्ता शेतकऱ्यांनी काय करायचं त्यांचा कांदा कसा विकला जायचा त्यांना भाव मिळणार का नाही असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत जर भावच मिळाला नाही तर जगायचं तरी कसं असा शेतकऱ्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उभा केला आहे कांदा प्रश्नावरून तर विरोधक आक्रमक झाले यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आलेच सांगितले.
बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील मात्र परिस्थिती वेगळीच आहे अजूनही बाजार समित्यांकडून कांद्याची खरेदी सुरू झाली नाही शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.