दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिटी फायटर्स युथ फौंडेशन संचलित श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळातर्फे जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. उत्सवानिमित्त सर्व सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा मल्लिकार्जुन मंदीर येथे ठेवण्यात आली होती. यासभेस मोठ्या संख्येने संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
या सभेत सर्वानुमते जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले. तसेच यावर्षी पासून जन्मोत्सव मंडळ जयंती उत्सवानिमित्त एक नवीन कौतुकास्पद पायंडा सोलापूरात घालत असून यावर्षीपासून वर्गणी न घेण्याचे ठरवले असून सर्व खर्च हे मंडळाचे सर्व सभासद यांनी एकत्र येऊन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ 2022 च्या नुतन पदाधिकारी यांची सर्वानूमते पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली
सिटी फायटर्स युथ फौंडेशन
बसव जयंती उत्सव-2022 पदाधिकारी निवड
अध्यक्ष:- श्री.सचिन कुलकर्णी
उपाध्यक्ष:- ऋषिकेश शिवशेट्टी
अविनाश बिराजदार
सचिव:- अनिकेत फताटे
सहसचिव:- सुरज अलकुंटे
खजिनदार:- शांतेश स्वामी
सहखजिनदार:- अभिजीत कुलकर्णी
कार्याध्यक्ष:- श्रीशैल आमले
सहकार्याध्यक्ष:- बाळासाहेब चौगुले
मिरवणूक प्रमुख:- हरिप्रसाद बंडेवार
श्रीशैल पारशेट्टी
आकाश हरकूड
प्रसिद्धी प्रमुख:- ओंकार पाटील
गणेश खटे
शंकर चिवडशेट्टी
सल्लागार समिती:- विरेश उंबरजे , प्रविण वाले, शिवानंद सावळगी, मेघराज दर्गोपाटील, शैलेश स्वामी (सर),
विश्वाराध्य मठपती (सर),महेश तोरणगी, योगेश इटाने, किरण जम्मा, विनायक शरणार्थी, शिवराज कडगंची,सुनील बेळळे,विजय निरगुडे,सतीश घंटे, सौरभ वर्दा, आकाश मकाई, गुरू हिरेमठ..
या सभेस सिटी फायटर्स चे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश जम्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पाडली. सूत्रसंचालन आकाश मकाई आणि आभार प्रदर्शन श्रीशैल आमले यांनी केले.