Big9news Network
आशांना तातडीने थकीत वेतन अदा न केल्यास येत्या 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय प्लस पोलिओ कार्यक्रमवर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी दिल्या.
लाल बावटा आशा स्वयंसेविका युनियन च्या वतीने पुष्पा पाटील व सिद्धराम उमराणी यांच्या नेतृत्वाखाली 14 फेब्रुवारी रोजी आशांचा मागील 4 महिन्यांपासून थकीत असलेला सर्व कामांचा मोबदला त्वरित मिळावे व अन्य न्याय व हक्काच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना शिष्टमंडळामार्फत निवेदन देऊन चर्चा करण्यात आले.
मा.जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे –
- जुलै 2020 पासून राज्य शासनाने आशा कार्यकर्तीना 2000 रु व आशा गटप्रवर्तकांना 3000 रु मानधन वाढ करण्याचा शासकीय आदेश काढला होता,परंतु अद्याप या आदेशाची अंमलबजावणी पूर्णतः झालेली नाही.मागील चार महिन्यापासून ही वाढीव रक्कम मिळालेली नाही ती त्वरित मिळावी.
- जुलै 2021 पासून राज्य शासनाने आशा कार्यकर्तीना 1000 रु व आशा गटप्रवर्तकांना 1200 रु ची मानधन वाढ तसेच कोव्हीड प्रोत्साहन भत्ता 500 रु देण्याचा शासकीय आदेश काढलेला आहे. परंतु मागील 7 महिन्यांपासून ही वाढ मिळालेली नाही. ती त्वरित मिळावी.
- केंद्र सरकारने ऑक्टोबर 2021 पासून कोव्हीड प्रोत्साहन भत्ता आशा सेविकांना दरमहा 1000 रु व गटप्रवर्तकांना 500 रु पूर्ववत सुरू केलेला आहे, परंतु मागील 4 महिन्यांपासून हा मोबदला मिळालेला नाही तो त्वरित मिळावा.
- आशा सेविकांना गरोदर मातांना प्रसूतीसाठी शासकीय रूग्णालयात घेऊन जावे लागते, प्रसंगी त्यांना रात्री पेशंट सोबत मुक्काम करावा लागतो, परंतु शासकीय रुग्णालयात त्यांच्यासाठी निवासाची सोय नसल्याने आशा सेविकांना रुग्णालयात उघड्यावर झोपावे लागते, आशा कक्षाबाबत शासनाने आदेश काढून देखील शासकीय रुग्णालयात अद्यापही आशा कक्षाची सोय करण्यात आलेली नाही तरी ताबडतोबीने आशा कक्ष उभारण्यात यावेत.
- आशा व आशा गटप्रवर्तकांना कामावर आधारित मोबदला मिळतो. कोव्हीड महामारी सुरू झाल्यापासून कोव्हीड सर्व्हेक्षण, व लसीकरण मोहिमेत सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत काम करावे लागत असल्याने त्यांना नियमित कामे करण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्यांची नियमित कामे मागे पडल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडून विनामोबदला लसीकरणाचे काम करून घेणे शासनाने त्वरित थांबवावे,
- आशा व आशा गटप्रवर्तकांना कोव्हीड लसीकरण मोहिमेचा मोबदला त्वरित मिळावा. या मागण्या घेऊन जोरदार निदर्शने केले.
यावेळी पुष्पा पाटील,सिद्धाराम उमराणी व डी.वाय.एफ.आय.चे जिल्हा सचिव अनिल वासम यांच्यासह अन्य आशांना पोलिसांनी ताब्यात घेतले.