Big9news Network
पंढरपूर : दि.15 जानेवारी रोजी झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड (जय किसान) या कंपनीचा गोवा येथील सम्राट डीएपी (DAP) हे खत दाखल झाले आहे. झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड च्या गोवा येथील 3 वर्षा नंतर उत्पादित झालेले या कारखान्याचे पहिले रॅक पंढरपूर येथे दाखल झाले.
या खताच्या स्वागतासाठी आयोजित समारंभात पंढरपूर तालुक्याचे कृषी अधिकारी श्री पवार साहेब, झुआरी कंपनीचे अधिकृत विक्रेते, उप-विक्रेते, प्रगतशील शेतकरी तसेच झुआरी कंपनीचे विक्री व्यवस्थापक श्री अमोल घोरपडे, श्री विक्रम लाड, श्री शिवम खाडे, व प्रतिनिधी, श्री जीवन जाधव कंपनीचे लॉजिस्टिक मॅनेजर आणि भोसले ट्रान्सपोर्ट चे श्री नागेश भोसले, श्री शैलेश भोसले आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता सम्राट डीएपी या खताची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
Leave a Reply