महा होम मिनीस्टर स्पर्धेच्या सहाव्या फेरीच्या सामन्याला सुरुवात २५० स्पर्धकांचा सहभाग…
०६ मार्च रोजी महाअंतिम सोहळा गेंट्याल टॉकीजच्या प्रांगणात…
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळ व नगरसेवक सुनिल कामाठी यांच्या विद्यमाने होत असलेल्या महा होम मिनीस्टरच्या ०६ व्या फेरीचा शुभारंभ आजरोजी
“शिवमंदिर” खड्डा तालीम ठिकाणी सुरुवात झाली यामध्ये अडीचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेची सुरुवात स्थानिक माता – भगिनींच्या शुभहस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली.
पूजनप्रसंगी जिजाऊ महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी मुळे- पवार, सुनिता सुनिल कामाठी,वंदनाबाई भिसे, पारुबाई विटकर,शोभाबाई येळणे, भगिरीथीबाई कोळी, सुनिताबाई पवार,मंगलाबाई चौधरी, दिलशाद नाईक,जयश्रीबाई शिंदे, एडवोकेट दीपा भोसले आदींसह ज्येष्ठ महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
या स्पर्धेचे समालोचन खुमासदार विनोदी ढंगात समालोचन बळवंत जोशी यांनी केले.
आज पर्यंत झालेल्या ०६ व्या फेरीपर्यंत एक हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.
अजून या स्पर्धेचे फेरी होणार असून या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा ०६ मार्च रोजी गेंट्याल टॉकीज येथे होणार आहे.