सोलापुरातील शिंदेसेनेच्या (शिवसेनेच्या) जिल्हा प्रमुख पदी मनीष काळजे आणि अमोल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र आज बुधवारी देण्यात आले.शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले असून राज्यात मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा सोलापुरातील मनीष काळजे यांच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते. त्यानंतर शिंदे गटाची ताकद वाढल्याचे चित्र सोलापूर शहरांमध्ये पसरले आहे.
याच दरम्यान सोलापूर महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी शिंदे गटात अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यानंतर आज बुधवारी सचिव संजय मोरे यांच्या हस्ते अमोल शिंदे, मनीष काळजे यांना शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.