Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

सोलापुरातील बाजार समितीमध्ये आज जवळपास सहा ते सात दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून व्यापारंमध्ये या प्रकरणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
पोलीस आयुक्तांनी या भागामध्ये ग्रस्त वाढावी अशी मागणी यापूर्वी वारंवार व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. या आधीही श्री सिद्धेश्वर बाजार समिती येथे चोरीच्या घटना घडलेल्या होत्या.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमी व्यापारी, कामगार ,शेतकरी यांच्यामुळे गजबजलेली असते. काल साधारण रात्रीच्या सुमारास वीरभद्र ट्रेडर्स ,मोहसीन ट्रेडर्स, एम रामचंद्र ट्रेडर्स ,पार्श्वनाथ ट्रेडर्स अशी दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी शटर न तोडता पत्रे उचकटून चोरी केल्याचे दिसून येते या ठिकाणी श्वान पथक हजर झालेले आहे.

नेमकी किती रुपयाची चोरी झाली, अथवा दुकानातील सामान,माल चोरीला गेला याची चर्चा सध्याला या परिसरात सुरू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *