मोबाईल व फोनची घंटी वाजल्यावर प्रत्येक वेळेला
तो उचलायलाचा का ?
मोबाईल हा तुमच्या सोयीसाठी आहे ?
तुम्हांला मोबाईल करणाऱ्यांच्या सोयीसाठी नाही ?
तरीही जेंव्हा आपण मोबाईलची घंटी ऐकतो तेंव्हा आपण अग्नीशामक दलाचे लोकं असून आगीची पाच वेळेला धोक्याची सूचना आल्या सारखे वागतो.
आपण अशा रितीने तो मोबाईल व फोन घ्यायला धावतो की जसे काही त्याच्यावर प्रत्युत्तर देण्यावर आपले जीवन अवलंबून आहे.
असे मला कधी कधी व नेहमीच वाटते.
1 )सकाळी टूथब्रश करताना.
2) आंघोळ करतांना बाहेर येणे.
3) साधनेच्या वेळात व्यत्यय.
4) नाष्टा.
5) आपण आपल्या कुटुंबासोबत शांततेत चाललेले जेवण.
6) दवाखान्यात उपचारासाठी.
7) गाडी चालवत असतांना
8) वाचनाचा वेळ.
9) एखाद्या व्यक्ती सोबत बोलताना.
आपण लगेचच तथाकथित महत्त्वाच्या फोनला प्रत्युत्तर द्यायला जातो.
10) काही महाभाग व्यक्ती असे असतात की आपला मोबाईल फोन व्यस्त आहे त्यांना अजिबात समजत नाही वारंवार फोन करतात
त्यांना हे कळत नाही की आपला फोन त्याना गेला आहे ते आपल्याला लावतील पण आपली इच्छा असते की त्यांना परत फोन लावावा पण इच्छा होत नाही
कारण त्यांनी आपल्याला डिस्टरब केलेले असते ?
जे फोन असे असतात की ते नंतर घेतले जाऊ शकतात.
मोबाईल व फोन आपला आहे त्याचे बिल आपण भरतो ?
तुम्हांला जेंव्हा वाटलं तेंव्हा आपण मोबाईल व फोन उचलू शकतो ?
प्रत्येक वेळेला मोबाईल व फोन वाजला की तो उचलायची सवय मोडणे अवघड आहे हे स्वानुभवावरून मला माहित आहे ?
तो मोबाईल व फोन घ्यायला धावत जाणे सोपे आहे कारण आपल्याला फक्त कुणी फोन केला हे जाणून घ्यायचे असते ?
शब्दांकन व शब्दरचना
राजेश जगताप
MH13
सोलापूर.
Leave a Reply