Big9 News
सोलापूरात जागतिक पाणथळ दिनाच्या निमित्ताने पर्यावरण विभाग, सोलापूर महानगरपालिका, पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि इको फ्रेंडली क्लब यांच्यावतीने नेचर वॉक आणि पक्षी तज्ञांशी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात असलेल्या पाणथळ परिसरात शुक्रवारी सकाळी हा उपक्रम पार पडला. तसेच प्रारंभी केगाव परिसरात मृत्युमुखी पडलेल्या काळविटांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. वैशाली कडूकर, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री मच्छिंद्र घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार, पर्यावरण अभ्यासक श्री शिवानंद हिरेमठ यांनी उपस्थित निसर्गप्रेमींना मार्गदर्शन केले. निसर्गरम्य वातावरणात नेचर वॉक करून सर्वजण आनंदून गेले होते. पाणथळ परिसर आणि पक्षी जगताविषयी माहिती सर्वांनी जाणून घेतली.
याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी श्री स्वप्निल सोलनकर, उद्यान अधीक्षक श्री रोहित माने, पोलीस निरीक्षक श्री दत्ता कोळेकर, श्री प्रवीणकुमार कांबळे, श्री सुशांत व्हराळे, श्री संग्राम थोरात, श्री सिद्धेश्वर जंगम, राखीव पोलीस निरीक्षक श्री भरत सावंत, श्री दीपक लोणकर, श्री अण्णासाहेब वाघमोडे, सौ. रोहिणी मच्छिंद्र घोलप, शोभा कुंभार, वृषाली कुंभार, उद्योजक सुयश खानापुरे, सोनाली खानापुरे, भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ कर्मचारी माधव वडजे, मेडिकल व्यवसायिक संतोषकुमार तडवळ, इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक श्री अजित कोकणे, शिक्षण विभागातील श्री अरविंद ताटे, कु. साक्षी ताटे, सीए सनी दोशी, कु. मिष्का दोशी, श्री अमोल मते, इतिहास अभ्यासक श्री नितीन अणवेकर, वाईल्ड लाइफ कंजर्वेशन असोसिएशनचे श्री संतोष धाकपाडे, श्री मयंक चौहान, श्री पंकज चिंदरकर, दिलीप भामरे, छायाचित्रकार सिद्धार्थ परीट, डॉ. प्रदीप कस्तुरे, श्रीपाद दुनाखे आदी उपस्थित होते.
इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक श्री परशुराम कोकणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. वाईल्ड लाईफ कंजर्वेशन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजित चौहान यांनी आभार मानले.